🕒 1 min read
Deepak Kesarkar । मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा सत्ताबदल झाला. मात्र या सर्व घडामोडी घडताना शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनेक मोठी वक्तव्ये आणि गौप्यस्फोट केले आहेत. केसरकरांनी वेळोवेळी शिंदे-ठाकरेंचे संबंध जुळवण्याचा प्रयत्न देखील केला. तर दुसरीकडे भाजपसोबत युती करून देखील केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. केसरकर आणि राणे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. तसेच यावेळी केसरकरांनी पुन्हा एकदा राणेंवर निशाणा साधलाय.
दीपक केसरकर म्हणाले कि, आपण राणेंचा कधीच प्रचार करु शकत नाही. तसेच याआधी केसरकर राष्ट्रवादीत असताना त्यांना नारायन राणे यांचा प्रचार करण्यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र, केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पण राणेंच्या व्यासपीठावर गेले नाहीत. त्याच दरम्यान, शरद पवारांकडे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता भाजपा आणि शिंदे गट एकत्र आल्याने कोकणात राजकीय परस्थिती काय होणार हे पहावे लागणार आहे.
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान राखत नाहीत. सत्तेसाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली आहे. बंडाच्या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच ही वेळ आल्याचे दीपक केसरकर यांनी वारंवार सांगितले होते. मात्र यानंतर आता आपल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी शरद पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. शिवाय ते एक ज्येष्ठ नेते असून माझ्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचेही केसरकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Balasaheb Thorat | “वीजदर २० टक्यांनी वाढवणे ही जनतेची फसवणूक”; बाळासाहेब थोरात यांचा आरोप
- Raj Thackeray Meeting : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात बैठक! राजकीय चर्चांना उधाण
- Deepak Kesarkar : “माझ्या जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा”; केसरकरांनी व्यक्त केली दिलगिरी
- Atul Londhe | पेट्रोल व डिझेलचे दर कपात करण्याच्या निर्णयानंतर अतूल लोंढे यांची प्रतिक्रिया
- Mahesh Tapase : इंधन दर कपातीचे श्रेय अजित पवार यांचे – महेश तपासे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
