Share

Amol Mitkari : “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या”; अमोल मिटकरींनी केसरकरांना सुनावलं!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकानंतरच होईल अशी शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केला होता. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांनी मदत केली. असा आरोप केसरकर यांनी केला होता. यावर आता ‘उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका, हवेतून खाली या.’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केसरकरांना सुनावलं आहे.

“केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही.” अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केसरकर यांच्यावर टीका केली आहे.

केसरकर काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते, असा आरोप केसरकर यांनी केला आहे. शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचे उत्तर शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असेही केसरकर म्हणाले. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. मी राष्ट्रवादीत असताना शरद पवार मला विश्वासात घेऊन सांगायचे. नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती. मात्र त्यांनी कोणत्या पक्षात जावे. ही अट ठेवली नसल्याचे शरद पवारांनी मला सांगितल्याचे केसरकर म्हणाले होते.

निलेश राणेंनी केसरकरांना लगावला टोला

“दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.”अशा शब्दात निलेश राणेंनी केसरकरांना उत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी साधला केसरकारांवर निशाणा

“अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो साहेबांचा निरोप घेऊन. जिथे आहात तिथे सुखी राहा, खाजवून खरूज काढू नका.” अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी दीपक केसरकारांवर पलटवार केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!