🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे जाणार की ठाकरेंकडेच राहणार असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धनुष्यबाणाच्या या लढाईत एकनाथ शिंदे गटाकडून आणि शिवसेनेकडून आपापला दावा ठोकला जात आहे. अनेक राजकीय कायदे तज्ञही या प्रश्नावर आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह देऊन टाकावं आणि उरलेलं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावं, अशा शब्दात रामदास आठवले यांनी धनुष्यबाणाच्या प्रश्नावर उत्तर दिले.
रामदास आठवले सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. उदगीर येथे असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबतच्या लढाईवर प्रश्न विचारले. त्यावर बोलताना आठवले म्हणाले की, “एकनाथ शिंदेंकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंकडे जाईल आणि उरलेलं शिवसेनेनं घ्यावं”
धनुष्यबाणाचं चिन्ह नेमकं कोणाला मिळणार असा पेच निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाकडे ४० आमदारांचे पाठबळ असल्यामुळे ते चिन्हावर स्वतःचा दावा ठोकतील अशी शक्यता आहे. कारण शिंदे गटातील नेत्यांनी अनेक वेळा आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे बोलून दाखवले आहे. मात्र दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे उघडपणे धनुष्यबाण आमच्याकडेच राहील असे बोलत आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांनी नवीन ओळख मिळाली तरी त्यावरही अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढण्यासाठी तयार राहा, असेही सूचक विधान केलेले आहे.
शिवसेनेला कोणीही हात लावू शकत नाही- अनिल परब
“शिवसेना ही केवळ बाळासाहेब ठाकरे यांची आहे. ही इतर कुणाची प्रॉपर्टी असूच शकत नाही. शिवसेनेला कुणीही हात लावू शकत नाही. पैश्याची लालच ही सर्वात मोठी लालच आहे. पण थू… तुमच्या पैश्यावर. प्रेम तुम्हाला पैशाने मिळणार नाही. पैसे आज ना उद्या संपतील पण जनतेचं हे प्रेम कधीही संपणार नाही. शिवसेनेची सदस्य संख्या ही ४० लाख इतकी आहे. त्यातून गेलेले ४० जण म्हणतात की शिवसेना आमची आहे. पण तस नाही, शिवसेना फक्त बाळासाहेबांचीच आहे”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
