Share

Kranti Redkar : क्रांती रेडकरने सांगितला मुंबई आणि लंडनमधील ट्राफिकचा मजेशीर किस्सा, म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. चात्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ही अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, तिने लंडनमधील आणि मुंबईतील ट्राफिकबद्दलचा एक किस्सा शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये क्रांती म्हणाली आहे की, “मी आणि माझी मैत्रिणी लंडनच्या त्या रस्त्यावर गाडीने जात असताना आमच्या आजूबाजूला मोजून चार ते पाच गाड्या होत्या. काहीच ट्रॅफिक नव्हतं. वीक डे होता आणि भर पीक अवरमध्ये फक्त एवढंच ट्राफिक होतं. त्यावेळी तिची सारखी कुर कुर सुरु होती. किती ट्राफिक आहे, किती वेळ लागणार असं ती सतत म्हणत होती.”

पुढे ती म्हणाली, “तुला ट्रॅफिक बघायचं असेल ना तर आमच्याकडे ये कधी तरी जुहू सर्कलला. आमच्याकडे फक्त एकावर गाडी चढवू शकत नाही म्हणून नाहीतर लोकांनी ते ही केलं असतं.” अशा प्रकारे क्रांती तिच्या मैत्रिणीला मजेशीर पद्धतीने मुंबईतील ट्राफिकबद्दल सांगते.

https://www.instagram.com/p/CfwFLfrFerv/

दरम्यान, क्रांतीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “अरे ट्राफिक काय असते हे कोणी मला विचारा. माझे माझ्या देशावर आणि शहरावर खूप प्रेम आहे. त्याच्यासारखे इतर कोणतेही शहर किंवा देश नाही. नाहीतर त्यावरुन काही लोक प्रवचन सुरु करतील. सो प्लीझच”, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!