🕒 1 min read
मुंबई : आनंद महिंद्रा सोशल मिडीयावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओच्या सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहेत. त्या व्हिडीओमुळे आनंद महिंद्रा चांगलेच चर्चेत आले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “की एक जुनी म्हण आहे – गरज ही शोधाची जननी असते…” सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
???????? As the saying goes: Necessity is the mother of invention… pic.twitter.com/VjyD2LzgAR
— anand mahindra (@anandmahindra) July 8, 2022
आनंद महिंद्राने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक तरुण गुडघाभर पाणी साचलेला भाग पार करण्यासाठी दोन प्लास्टिकच्या स्टूलसह एक अनोखा ‘जुगाड’ करतो. त्याला पाण्यात उतरावे लागू नये म्हणून या तरुणाने स्टूलला दोरी बांधली आहे, ज्याच्या मदतीने तो एक स्टूल उचलतो आणि पुढे करतो, नंतर दुसरा स्टूल करतो आणि अशा प्रकारे तो स्टूलच्या सहाय्याने चालतो.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
