🕒 1 min read
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray ) यांनी टीका केली आहे.
“आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है…..!”, असे ट्वीट शालिनी ठाकरे यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी संपलेला पक्ष हा हॅशटॅगही वापरला आहे.
आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे,पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत…..!!!
आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही…….
समय समय की बात है…..!!!#आदित्यठाकरे #निष्ठायात्रा#संपलेलापक्ष #शिवसेना
— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 9, 2022
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला कालपासून म्हणजेच 8 जुलैपासून सुरुवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करत आहेत. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “…त्यांनीच शिवसेना फोडून आनंदाची विकृत ढेकर दिली”, संजय राऊतांचा टोला
- Shiv Sena : मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळणार?; ‘शिवसेने’चा नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना सवाल
- Narayan Rane : “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा उभी…”, नारायण राणेंची जहरी टीका
- Shiv Sena : मुख्यमंत्री निघाले दिल्लीला! “भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केले तर…”, शिवसेनेचा इशारा
- BJP vs Shivsena : महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंना बसवलं, आता उपराष्ट्रपती पदावर माजी शिवसैनिकाला बसवण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
