🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध (ENG vs IND) पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टीमसोबत नेट सेशनमध्ये भाग घेतला. रोहित शर्मा काही मोहक फटके मारताना दिसला. पहिला टी-२० सामना साऊथम्प्टन येथील एजस बाऊल येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने होणार आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने सराव सत्रात भाग घेऊन फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून काही चांगले शॉट्स पाहायला मिळाले. रोहित शर्माने ड्राईव्ह, पंच आणि इनसाइड आऊट असे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्माच्या फलंदाजीचा व्हिडिओ स्टेडियमच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये तो खूप चांगल्या लयीत दिसत आहे.
The @BCCI captain has arrived ????@ImRo45 has a net session at The Ageas Bowl, what a player ????
Let us know if you want to see more of Rohit from the nets! #ENGvIND #TeamIndia #RohitSharma #BCCI pic.twitter.com/kkoIH2jdD3
— Utilita Bowl (@UtilitaBowl) July 6, 2022
भारतीय संघाला नुकतेच इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, पहिल्या टी-२०मध्ये कसोटीपटू नसतील. या सामन्यासाठी बीसीसीआयने आधीच वेगळा संघ निवडला होता. अशा स्थितीत इतर खेळाडूंचा खेळ पाहण्यासारखा असेल. आयर्लंड दौऱ्यावरून इंग्लंडमध्ये आलेल्या दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याचा खेळ महत्त्वाचा ठरणार आहे.
पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
