Share

काय सांगता..! विराट कोहलीची होणार टीम इंडियातून हकालपट्टी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते विराट कोहलीच्या टी-२० कारकिर्दीबाबत निश्चित नाहीत. जर विराट कोहलीने इंग्लंड मालिकेत चांगली कामगिरी केली नाही तर त्याला संघातून वगळले जाऊ शकते.

विराट कोहली गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याला कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याच वेळी, त्याचे यंदाचे आकडे अगदी साधे आहेत. आयपीएल २०२२ विराट कोहलीसाठी काही खास नव्हते. तीन सामन्यांत तो शून्यावरही बाद झाला. अशा स्थितीत विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून आपल्या शतकाची वाट पाहत आहे.

अलीकडेच विराट इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातही फ्लॉप ठरला होता. अशा स्थितीत त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-२० मध्ये त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तर त्याला टी-२० संघातूनही वगळले जाऊ शकते. असे झाल्यास विराट कोहलीसाठी हा मोठा धक्का असेल.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!