Share

VIDEO : माहीचा बर्थडे लंडनमध्ये..! नव्या लूकमध्ये धोनीनं कापला केक; पंतनंही नोंदवली उपस्थिती!

Published On: 

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज ४१ वर्षांचा झाला आहे. भारतासाठी तीन आयसीसी विजेतेपद पटकावणारा धोनी सध्या इंग्लंडमध्ये कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे. ४ जुलै रोजी त्याच्या लग्नाचा १२वा वाढदिवस होता. यंदा धोनीने कुटुंब आणि मित्रांसोबत खास सेलिब्रेशन केले. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पत्नी साक्षी धोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनीही नव्या लूकमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतही दिसत आहे. पंत सध्या भारतीय क्रिकेट संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. तो आज गुरुवारी (७ जुलै) इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० संघाचा भाग नाही. यामुळे त्याने धोनीसोबत खूप धमाल केली.

https://www.instagram.com/p/CfsExi5gMgO/

धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली भारताने २००७ मध्‍ये पाकिस्तानचा पराभव करून टी-२० विश्‍वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. त्याच वेळी, २०१३ मध्ये टीम इंडियाने इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. धोनीनंतर भारतीय संघाला ९ वर्षे आयसीसीचे जेतेपद मिळवता आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!