Share

Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत 

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई: आपल्याच पक्षातील नेत्यांनी मोठा धक्का देत शिवसेनेला मोठी जखम दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा धक्का पचवणे अत्यंत कठीण गेले. एकनाथ शिंदे यांनी बंडाला सुरुवात केली आणि एकापाठोपाठ अनेक नेत्यांनी सेनेशी पाठ फिरवली. याचा परिणाम म्हणजे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले. “आपल्याच माणसांनी पाठीवर घाव देत पुढची पायरी गाठली”, अशी परिस्थिती सध्या पहावयास मिळाली. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हीच परिस्थिती अधोरेखित करणारे ट्वीट केले आहे. सध्या ते चर्चेत आहे.

“नेमके हेच घडले!”, असे म्हणत संजय राऊत यांनी एक व्यंगचित्रही पोस्ट केले आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काल (२९ जून) रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. अनेक राजकीय घडामोडीनंतर अखेर महाराष्ट्रातील राजकारणावर पडदा पडला. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!