🕒 1 min read
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले असून यासाठी फक्त आजचा दिवस शिल्लक आहे. उद्या (३० जून) मविआ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन नेते अर्थातच मंत्री नवाब मलिक (NCP leaders Nawab Malik) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
तुरुंगात बंद असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्या महाराष्ट्रातील फ्लोर टेस्टला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली आहे. सुप्रीम कोर्टाने आज संध्याकाळी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.
दरम्यान शिवसेनेने बहुमताच्या निर्णयाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole : “…अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत?”, नाना पटोलेंचा सवाल
- इंग्लंडचा दिग्गज कप्तान मायकेल वॉन BBC कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर..! वाचा नक्की झालं काय
- Spruha Joshi : “आयुष्यात पहिल्यांदाच…”, प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीने शेअर केला वारीचा अनुभव
- Eknath Shinde : आसाम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बंडखोर आमदार देणार ५१ लाख रुपयांची मदत
- IND vs IRE : ‘हा’ वेगवान गोलंदाज आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यात ‘झिरो’वरून झाला ‘हिरो’, वाचा!

