🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या तिच्या अनन्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अनन्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. येत्या २२ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’, असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’च्या जिद्दीचा प्रवास पाहण्यास मिळणार आहे. या चित्रपटात अनन्या ची भूमिका हृता दुर्गुळे साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अनेक लोकांना आवडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हृताचा पती प्रतिक शहा पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
प्रतिकने हृतासोबतच एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, अनन्या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे. इच्छा, धैर्य, शौर्य, निश्चय आणि एक सामान्य माणसाच्या ताकदी पलिकडीची या चित्रपटाची कथा आहे. खरं तर एका सामान्य मुलीची विलक्षण कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. आताच ट्रेलर पाहा.”
https://www.instagram.com/p/CfVcvAiKGyX/
दरम्यान, ट्रेलरमध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी अनन्या दिसत आहे. शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ हा खूप मोलाचा सल्ला या चित्रपटामधून मिळत आहे. या चित्रपटा मधील ‘अनन्या’चा ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यासोबत चाललेला लढा प्रत्येकालाच जगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. असे दिग्दर्शक प्रताप फड यांनी म्हटले आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. त्याचबरोबर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया या चित्रपटाचे निर्माते आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
