Share

TMKOC : दयाबेन, मेहता साहेबांनंतर आता ‘या’ कलाकारानेही सोडली “तारका मेहता…” मालिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण चाहत्यांसाठी अजून एक बातमी समोर येत आहे. आत्तापर्यंत बऱ्याच अफवा येत होत्या की, टप्पू म्हणजेच राज अनडकट देखील या मालिकेमधून निरोप घेणार. पण आता टप्पू मालीका सोडणार असल्याची खरी माहिती समोर येत आहे.

टप्पूचे पात्र बरेच दिवस झाले मालिकेमध्ये दिसत नाही कारण टप्पू अभ्यासासाठी मुंबईबाहेर जात असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात अशी बातमी आली होती की त्याने आता या मालिकेला अलविदा केले आहे. आतापर्यंत फक्त यावर चर्चा होत होती. पण आता बातमी आली आहे की राज अनडकटने बॉलिवूडमध्ये आपला मार्ग शोधला आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. तो रणवीर सिंगसोबत एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/CfLYXnmrPhM/

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. सगळ्यात पहिल्यांदा टप्पुची भूमिका भव्य गांधीनी साकारली होती. त्याने देखील हा शो सोडला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!