Share

Sumit Khambekar : अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह; ‘मनसे’ने म्हटले, “मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या कारण..”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar tests positive ) काल कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही अजित पवारांनी केले. मात्र यावरच औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर (Sumit Khambekar) यांनी अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्या, असे म्हणत खोचक टोला लगावला आहे.

“दादा तुम्ही बिलकुल चिंता करू नका, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी एका दिवसात कोरोनाला बरे करत मातोश्री वर मीटिंग घेतली, वर्षा ते मातोश्री प्रवास लोकांच्या मध्ये मिसळून केला, त्यामुळे तुम्ही लगेच मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या. राजकीय सोडा काळजी घ्या दादा.”, असे ट्वीट सुमित खांबेकर यांनी केले आहे.

दरम्यान “काल मी कोरोनाची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.”, असे ट्वीट अजित पवारांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!