🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार विरोधात दोन याचिका दाखल केल्यात. यावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली आहे. यामध्ये बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर युवासेना प्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, जे पळून गेले आहेत ते स्वत:ला बंडखोर म्हणत आहेत. जर त्यांना बंड करायचं होतं तर इथेच करायला हवं होतं. दगाफटका करणारे, पळून जाणारे जिंकत नाहीत. महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा ते आमच्यासमोर बसतील तेव्हा दुसऱ्यांदा विश्वासदर्शक ठराव असेल. डोळ्यात डोळे घालून आम्ही काय चुकीचं केलं हे ते सांगतील असंही ते म्हणाले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील 5 मोठे मुददे पुढील प्रमाणे आहेत. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई १२ जुलैपर्यंत टळली. उपाध्यक्षांच्या सूचनेला उत्तर देण्यासाठी बंडखोर आमदारांना 12 जुलै सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि अजय चौधरी, तसंच केंद्राला सुप्रीम कोर्टाची नोटीस, म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षणं करावे. पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. तसेच ११ जुलैपर्यंत बहुमत चाचणी घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
