🕒 1 min read
मुंबई : सध्या राज्यात राजकीय भूकंपाचा उद्रेक झाला असतानाच दुसरीकडे दुसरीकडे मुंबई (Mumbai) मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. काल रात्री मुंबईच्या कुर्ला भागातील एक चार मजली इमारत कोसळली. अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्याकडून बचावाचे कार्य सुरुच आहे.
इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. तर अजूनही 5 ते 6 लोक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. तसेच ही इमारत जुनी असल्याची माहिती मिळतेय. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीस दिली गेली होती. मात्र तरिही काही कुटुंब याठिकाणी राहत होती.
सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारत ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरिही या इमारतीत कुटुंब वास्तव्य करत होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे कुणालाच जीव वाचवण्यासाठीची संधीही मिळू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
