Share

Sanjay Raut : “…पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारेल का?” ; संजय राऊतांचा बंडखोरांवर निशाणा

Published On: 

मुंबई: बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि हे असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोहयांचे हात बळकट करायचे. “महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करू,” असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर “यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे हो ऽऽ,” म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोडे बंद पडतील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढे दिले. भारतीय जनता पक्षाशी जे पाट लावू इच्छित आहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून केला आहे.

भारतीय जनता पक्षाची अलीकडच्या काळातील वक्तव्ये जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. एका बाजूला चंद्रकांत पाटलांनी सांगायचे, शिवसेनेत जे सुरू आहे त्याच्याशी आपला संबंध नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्याच वेळी रावसाहेब दानवे यांनी अंगास हळद लावून व मुडावळ्या बांधून बोलायचे, आता फार तर एक-दोन दिवसच विरोधी पक्षात बसू, दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचे सरकार येईल. शिवसेनेतील बंडाशी संबंध नाही असे म्हणायचे व दुसया बाजूला दोन दिवसांत भाजपचे सरकार येईल, असे बोलायचे. त्यामुळे खरे काय? असा सवाल संजय राउत यांनी भाजपला केला आहे.

मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन श्री. शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे. बडखोर आमदारांना जे करायचे त्यासाठी ते मुखत्यार आहेत. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!