🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केवळ आमदारच नाही तर शिवसेनेच्या कोट्यातील जवळपास सर्वच मंत्रीही आहेत. उद्धव ठाकरेंना रोजच धक्का बसतोय. काल (रविवार) महाराष्ट्राचे आणखी एक मंत्री उदय सामंतही गुवाहाटी येथे पोहोचले असून ते आमदारांच्या असंतुष्ट छावणीत सामील झाले आहेत. सामंत आज गुजरातमधील सुरतहून गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यानंतर आता शिंदे गटात शिवसेनेचे 39 तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार आहेत. दुसरीकडे मंत्र्यांचा विचार केला तर 9 मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरे उरले आहेत. यामुळे महाराष्ट्र सरकार वाऱ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले, “राज्यात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न कायम आहे. त्यामुळे राज्यात कुणीही सत्तेत या, आणि कुणीही विरोधात बसा पण राज्यात सुरू असलेला गोंधळ लवकरात लवकर संपवा आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवा, असं आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे. ते जालन्यातील वडीगोद्री येथे बोलत होते.
“सध्या राज्यात अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील गोंधळ संपवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा”, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे बहुतांश मंत्री शिंदे गटात आहेत
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून १३ मंत्री आहेत. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले सात मंत्री शिंदे गटात आहेत. त्यात एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, उदय सामंत, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
