🕒 1 min read
सिंधुदुर्ग : कुडाळ येथे एका आयोजित कार्यक्रमात भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “चूक तुमची आहे मान्य करा. गुवाहाटी ला गेलेत ते काय स्वखुशीने गेले नाहीत, कोण पक्ष सोडत नाही. आम्ही पण पक्ष स्वखुशीने सोडला नाही. उद्धव ठाकरें सारख्या लोकांमुळे पक्ष सोडावा लागतो. आमदारांना भेटत नाहीत, कार्यकर्त्यांना काय भेटत असतील. शिंदे, सचिन अहिरे, आणि हा तिसरा, एका मतदार संघात बापाला तीन आमदार निवडून आणावे लागले. एवढी खात्री होती, तर मुलाच्या मतदार संघातील तीन आमदार निवडून आणावे का लागले?” असा सवाल निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी आमदारक्या वाटल्या नसता तर मुलगा निवडून सुद्धा आला नसता” असा टोला राणेंनी यावेळी लगावला आहे. “जमिनीवर या, तुमचं स्वकर्तृत्व काही नाही, हवेत उडायचं बंद करा. महाराष्ट्र सगळे बघतोय आणि चीड आहे महाराष्ट्राला. आता तरी जमिनीवर येऊन काम करा, ज्याना सांभाळून घ्यायचे त्यांना सांभाळून घ्या. पण जर मस्तीत रहाल तर तुमची मस्ती कशी उतराव्याची हे आम्हाला माहिती आहे.” असं देखील निलेश राणे यावेळी म्हणाले.
“पक्ष संपवण्याची कुणाची इच्छाच नसते, इच्छा असते की आम्हाला चांगली वागणूक मिळावी, आमच ऐकून घेतलं जावं हीच मागणी असते. दुसर त्यांना काय पाहिजे? ते सगळे बाहेर पडताना पक्ष संपवण्यासाठी बाहेर पडले नाही. विनायकराव मातोश्रीचे दलाल असून मातोश्री मध्ये बिस्कीट मिळेल यासाठी त्यांची धडपड असते” अशी जहरी टीका निलेश राणे यांनी यावेळी केली.
“काही दिवस, काही तास उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहिले. ठाकरे पळून बसतील आणि कुठल्या बिळात जातील कळणार सुद्धा नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये धुडगूस घालू नका. अजून पर्यंत एक बाजू शांत आहे, महाराष्ट्रात काय घडवायचं आहे तुम्हाला? जर काही बरं वाईट घडलं तर महाराष्ट्राचे नुकसान होणार. मुख्यमंत्री तुम्ही आहात, कायदा-सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी तुमची आहे. तर तुमचेच कार्यकर्ते जाऊन बांबू, हॉकी घेऊन कार्यालय तोडतात. जेव्हा आम्ही मागणी करायची राष्ट्रपती राजवट आणा, सामान्य लोक भरडली जातात तर म्हणे भाजपचा डाव आहे. तुमचे कार्यकर्ते धुडगूस घालतात, पण हे जास्त दिवस महाराष्ट्र सहन करणार नाही. ठाकरेंनी अजून जरी घमेंड सोडला नाही तर, जेव्हा दुसरी बाजू उभी राहील हे सहन होणार नाही ठाकरेना, कारण यांना लढायची सवय नाही.” अशा खोचक शब्दांत निलेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
