Share

Raju Patil : “आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान” ; सत्तानाट्यावर राजू पाटलांची खोचक प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. शिंदे गटाचं संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संकटात सापडले आहे. या पाश्वर्भूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटद्वारे खोचक टीका केली आहे.

“जे आम्हाला सोडून गेले, ते आमच्यासाठी मेले !’ असे ठणकावणाऱ्या आमच्या साहेबांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नाहीतर हे ! एकीकडे सैनिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे पक्षप्रमुखांसहीत संपूर्ण परिवार गुपचुप बंडखोरांच्या मनधरणीचे ‘सर्व’ प्रयत्न करत आहेत”, असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. 

 

संजय राऊतांचे ‘भाऊ’ शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत?

संजय राऊत वारंवार बंडखोर नेत्यांवर टीका करताना पाहायला मिळत असतानाच एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे, ती म्हणजे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहे. ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत अशी माहितीही सूत्रांनी एका वृत्तावाहीनीला दिली आहे.  सुनील राऊत हे बंडखोर आमदारांच्या गटात सामील होण्यास तयार आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज झाले होते. यातून त्यांना मनातील खदखद दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!