Share

Nana Patole : शिवसेनेच्या भरवशावर जे मोठे झाले ते आज शिवसेना संपवू पाहत आहेत; नाना पटोलेंचा शिंदेंना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. यानंतर आता या सर्व घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नाना पटोले म्हणाले कि, शिवसेना पार्टी संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. शिवसेनेच्या भरवशावर जे मोठे झाले ते आज शिवसेना संपवू पाहत आहेत. भाजपच्या हिंदू प्रेमात कोणतीही प्रामाणिकता नाही. पाकिस्तानचे समर्थन करत तत्कालिन मुख्यमंंत्री मेहुबुबा मुफ्तीसोबत यांनी साडेतीन वर्षे सरकार चालवलं आहे. असं म्हणत पटोलेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

दरम्यान, दिल्लीला हे महाग पडणार आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने राज्यावर नजर टाकली तेव्हा नाश झाला आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. त्यामुळे तमाशा थांबवा. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे तीन कार्यकर्ते आहेत. भाजप केंद्रातील सरकारच्या भरवश्यावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही पटोले यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!