🕒 1 min read
मुंबई : मध्य प्रदेशने अंतिम सामन्यात बलाढ्य मुंबईचा (Ranji Trophy 2022 Final) ६ गडी राखून पराभव करून प्रथमच रणजी करंडक विजेतेपद पटकावले. ४१ वेळच्या चॅम्पियन मुंबईने दिलेल्या १०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेशच्या संघाने ६ विकेट्स राखून ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली. मध्य प्रदेशच्या दुसऱ्या डावात सलामीवीर हिमांशू मंत्रीने ३७ धावा केल्या तर शुभम शर्मा ३० धावा करून बाद झाला. रजत पाटीदारने नाबाद ३० धावा केल्या. मुंबईकडून दुसऱ्या डावात शम्स मुलाणीने तीन तर धवल कुलकर्णीने एक बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना मध्य प्रदेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. एकूण धावसंख्येमध्ये केवळ २ धावांची भर पडली असतानाच धवल कुलकर्णीने यश दुबेला बाद करत मध्य प्रदेशला मोठा धक्का दिला. यश एक धाव काढून बाद झाला. यानंतर हिमांशू मंत्री ३७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हिमांशूने आपल्या खेळीत ३ चौकार मारले. तत्पूर्वी, मुंबईने पाचव्या आणि शेवटच्या दिवशी २ बाद ११३ धावा पुढे खेळायला सुरुवात केली. दुसऱ्या डावात चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा अरमान जाफर ३० धावांवर आणि सुदेव पारकर नऊ धावांवर खेळत होते. कर्णधार पृथ्वी शॉसह हार्दिक तोमोरला झटपट धावा करण्यासाठी डावाची सलामी देण्यासाठी पाठवण्यात आले, परंतु शॉ ४४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तोमोरने २५ धावा केल्या आणि त्याला कुमार कार्तिकेयने बाद केले. अरमान जाफरच्या रूपाने मुंबईने तिसरी विकेट गमावली.
Who’s the champion?
Madhya Pradesh #RanjiTrophy pic.twitter.com/qWTIaEbFMs
— Shashank Kishore (@captainshanky) June 26, 2022
Rajat Patidar hits the winning runs, and it's a historic day for Madhya Pradesh!
They win their first-ever #RanjiTrophy title, beating Mumbai by six wickets in the final ????
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 26, 2022
अरमान वैयक्तिक धावसंख्येत ७ धावा जोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ३७ धावा केल्या. जाफरला कार्तिकेयने बोल्ड केले. यानंतर सुवेद पारकरने एक टोक धरत अर्धशतक पूर्ण केले. ५१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो कार्तिकेयच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला आणि मुंबईला चौथा धक्का बसला. सुवेद बाद झाल्यानंतर सर्वांच्या नजरा सरफराज खानवर होत्या. सरफराजने ४५ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
