Share

Eknath Shinde : एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गदारोळात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे समर्थक आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. गुवाहाटीमध्ये सध्या ५० आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ते दारूच्या नशेत असल्यासारखे वाटत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये “सत्ता के नशे मे झूम शाबी झूम बराबर” असे लिहिले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ स्वराज इंडियाचे नेते आणि वकील प्रशांत भूषण  यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओ मागची सत्यता जाणून घेणं गरजेच आहे.

काय आहे व्हिडीओमागचं सत्य ?

हा व्हिडीओ २ मिनिटांचा आहे. मात्र यामधील 30 सेकंदांची एक क्लिप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून शिंदे नशेत होते का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र या व्हिडीओ मागचं सत्य वेगळचं आहे. एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सुरत विमानतळावरून गुवाहाटीला जात असताना माध्यम प्रतिनिधींनी विमानतळावर गर्दी केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांना पोलिसांनी पळवतच नेले होते. प्रतिनिधींनी केलेली गर्दी आणि पोलिसांचा ताफा यामुळे एकनाथ शिंदे यांना व्यवस्थित उभ राहता येत नव्हते. ते नशेत नसून गर्दीमुळे या व्हिडीओमध्ये ते असे दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!