Share

Aditya Thackeray : “अडीच वर्षात ज्यांनी हिंदूत्वाचा ‘ह’ काढला नाही… “, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिवसेना मेळाव्यात बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

“अडीच वर्षात ज्यांनी हिंदूत्वाचा ‘ह’ काढला नाही आज ते हिंदुत्वाबद्दल बोलत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अनेक आमदारांची नावेही घेतली.  जे काल परवा आमच्या सोबत होती, त्यांनी धोका दिला. गद्दारी केली. मात्र त्यांनी माझ्यासमोर यावे आणि मग बोलावे.”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे ते म्हणाले कि, संदीपान भुमरे, संजय शिरसाट प्रदीप जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला. तो कुणाला विकत घ्यायला किंवा द्यायला नाही, तर विकास कामांसाठी दिला असल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. दरम्यान यावेळी आदित्य ठाकरेंनी एक मोठा खुलासा केला आहे. “२० मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली.” असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!