🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय संकटाच्या सहाव्या दिवशी एक मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आज (रविवार) शरद पवार यांच्यासोबत झालेल्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिंदे गटाचे २० आमदार सतत संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी देखील मोठा खुलासा केला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ते आज मुंबईतील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, “20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली.
आदित्य ठाकरे स्पष्ट म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना म्हणाले, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? घ्या मी तुम्हाला मुख्यमंत्री बनवतो. मात्र या प्रश्नानंतर एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ सुरू केली आणि त्यानंतर 20 जून रोजी बंड केला”.
काल (शनिवार) मुंबईतील लाला कॉलेजच्या सभागृहात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाषणातून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला इशारा दिला. विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो, लक्षात ठेवा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “बरं झाली घाण गेली. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
