Share

IND vs ENG : मोठी बातमी..! लक्षवेधी कसोटी सामन्यात बदल; इंग्लंड क्रिकेट बोर्डानं…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एजबॅस्टन येथे होणार्‍या भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाचव्या कसोटी सामन्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हा कसोटी सामना उभय संघांदरम्यान १ जुलैपासून खेळवला जाणार आहे आणि आता वृत्तानुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) या सामन्याची वेळ बदलली आहे.

सामान्यतः इंग्लंडमधील कसोटी सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होतो, परंतु एजबॅस्टन येथे होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अर्धा तास आधी सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार, सामन्याचा पहिला चेंडू दुपारी ३ वाजता टाकला जाईल आणि दिवसाचा खेळ रात्री १० वाजता संपेल. या दरम्यान ९० षटकांचा खेळ पूर्ण करण्यासाठी अर्धा तास राखीव ठेवण्यात आला आहे. भारतात कसोटी सामने सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतात, परंतु इंग्लंडमध्ये ते सकाळी ११ वाजता सुरू केले जातात जेणेकरून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांना दवाचा फायदा मिळू नये.

सामना सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून त्याला सध्या आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी सकाळी ही माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघ आणि लीसेस्टरशायर यांच्यात खेळल्या जात असलेल्या सराव सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा फलंदाजीसाठी आला नाही, काही समस्यांनंतर त्याची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली ज्यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!