🕒 1 min read
मुंबई : हार्दिक पंड्याला आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत (IND vs IRE) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. हार्दिक पुनरागमनाच्या चांगल्या टप्प्यातून जात आहे. त्याने आयपीएल पदार्पण केले्ल्या गुजरात टायटन्सला विजेतेपदग मिळनून दिले. आता त्याने आगामी मालिकेपूर्वी एक विधान केले आहे.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला हार्दिक म्हणाला, ”मी येथे कोणाला काही दाखवण्यासाठी आलेलो नाही. मला भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. कोणाला काही दाखवण्यासाठी मी हा खेळ खेळत नाही. मी भविष्याकडे लक्ष देईन, अन्यथा मी या मालिकेत काय आणू शकतो यावर मी लक्ष केंद्रित केले आहे.”
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे, तर उर्वरित २०२२ टी-२० विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहेत. तो म्हणाला, “आम्हाला खेळाडूंना संधी द्यायची आहे पण त्याचवेळी आम्हाला सर्वोत्तम ११ खेळाडूंसोबत खेळायचे आहे. मैदानात उतरताना आमच्याकडे सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू असायला हवेत, याची काळजी घ्यावी लागते. आमचे लक्ष फक्त या बाजूला असेल.”
भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या मालिकेत ऋषभ पंत कर्णधार होता. तो सध्या इंग्लंडमध्ये असून पंड्याकडे आयर्लंड दौऱ्याची कमान सोपवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
