🕒 1 min read
मुंबई : १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या पुनर्निर्धारित पाचव्या कसोटी (IND vs ENG) सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोना झाला असून त्याला आता पाच दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध एजबॅस्टन कसोटीसाठी रोहित उपलब्ध असणार का यावर शंका निर्माण झाली आहे. रोहित टीम हॉटेलमध्ये आयसोलेशन पूर्ण करत आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेदरम्यान त्याला प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. याचा अर्थ तो पाच दिवस आयसोलेशनमध्ये असेल.
रोहित शर्माला कोरोना झाल्याची बातमी लीसेस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी समोर आली. कदाचित याच कारणामुळे त्याने या सामन्यात भारतासाठी दुसऱ्या डावात सलामी दिली नाही. त्याने पहिल्या डावात सलामी देत २५ धावांचे योगदान दिले होते.
Team India captain Rohit Sharma has tested positive for COVID-19 following a Rapid Antigen Test (RAT) conducted on Saturday. He is currently in isolation at the team hotel: BCCI pic.twitter.com/Z6mpBmk7pR
— ANI (@ANI) June 26, 2022
भारतीय संघाने गेल्या वर्षी इंग्लंडचा दौरा केला होता, मात्र पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोरोनाच्या प्रकरणांमुळे पुढे ढकलण्यात आला होता. त्यावेळी भारतीय संघ मालिकेत २-१ने आघाडीवर होता. भारताच्या चांगल्या कामगिरीचे कारण म्हणजे रोहित शर्माची फलंदाजी. रोहितने ८ डावात ३६८ धावा केल्या होत्या आणि तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
