🕒 1 min read
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या सहकारी खेळाडूंच्या कठीण काळात किंवा संकटात नेहमीच उभा राहतो आणि संधी मिळेल तेव्हा त्यांची ढाल बनतो. भलेही तो आता टीम इंडियाचा कर्णधार नसेल. पण, सहकारी खेळाडूंसाठी तो पुढे यायला अजूनही मागेपुढे पाहत नाही. भारत आणि लीसेस्टरशायर यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराटने भारतीय गोलंदाज कमलेश नागरकोटीला त्रास देणार्या चाहत्याचे तोंड बंद केले.
विराट कोहलीच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहली स्टेडियमच्या बाल्कनीत उभा राहून चाहत्याशी बोलताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की शुक्रवारी स्टेडियममध्ये बसलेले भारतीय चाहतेच कमलेश नागरकोटीला टोमणे मारत होते आणि त्याला सतत ट्रोल करत होते. जेव्हा कोहलीला हे समजले तेव्हा त्याने चाहत्याला गप्प बसवले.
https://www.instagram.com/reel/CfOS25Zjpia/?utm_source=ig_embed&ig_rid=5fe05782-d025-472d-b85f-dbf873de93d1
कोहली स्टेडियमच्या बाल्कनीतून चाहत्याला ओरडताना दिसला. कमलेशसोबत तुम्ही गैरवर्तन का करत आहात, तो तुमच्यासाठी नाही तर सामना खेळण्यासाठी आला आहे, असे व्हिडीओमध्ये बोलताना ऐकू आले. याआधी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले होते. धर्माच्या नावाखाली त्याला लक्ष्य करण्यात आले. त्यानंतरही कोहली उघडपणे शमीच्या समर्थनात उतरला आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
