Share

IND vs ENG : विराट कोहली पुन्हा होणार भारताचा कर्णधार?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) एकमेव कसोटी सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली. रॅपिड अँटीजेन चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा स्थितीत तो बर्मिंगहॅम कसोटीतून बाहेर होऊ शकतो. आता प्रश्न असा पडतो की जर रोहित इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत खेळला नाही तर त्याच्या जागी संघाचे नेतृत्व कोण करणार? सहसा जेव्हा कर्णधार कोणत्याही कारणामुळे सामना खेळू शकत नाही तेव्हा उपकर्णधार संघाची कमान सांभाळतो. पण, टीम इंडियासमोर एक मोठी समस्या उभी आहे, कारण इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी केएल राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले होते. पण कंबरेच्या दुखापतीमुळे तो केवळ या कसोटीतूनच नाही तर इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर पडला आहे. अशा स्थितीत कर्णधार आणि उपकर्णधार या दोघांच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न उरतोच.

ही कसोटी ही गेल्या वर्षी झालेल्या मालिकेचा भाग आहे. त्यानंतर कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होऊ शकला नाही. भारत या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर होता. अशा परिस्थितीत टीम इंडियाला प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. गेल्या इंग्लंड दौऱ्यावर भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तेव्हा विराट कोहली संघाचा कर्णधार होता आणि आता रोहितच्या हाती कमान आहे. अशा परिस्थितीत, कोरोना पॉझिटिव्ह रोहित बर्मिंगहॅम कसोटी खेळू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

जर रोहित इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत खेळू शकला नाही तर त्याच्या जागी कर्णधार कोण असेल? हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहितने टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारून काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे, बर्मिंगहॅम कसोटी भारतासाठी किती महत्त्वाची आहे, हे जाणून मालिका जिंकून कोहलीला कर्णधारपद सोपवता येऊ शकते. कोहलीच्या नावाचा विचार न झाल्यास ऋषभ पंत पाचव्या कसोटीत कर्णधारपद भूषवू शकतो. केएल राहुलच्या दुखापतीमुळे पंतने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. त्याच्यावर निवड समितीचाही विश्वास आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या अनुपस्थितीत तो टीम इंडियाची कमान सांभाळण्याची शक्यता जास्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!