🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला दणका दिला. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने, पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आलेत. निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ होते. शिंदे शिवसेनेच्या १३ आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू असताना आता नारायण राणे यांनी या प्रकरणी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे म्हणाले, “महाराष्ट्रात आता मविआ सरकार राहिलेलं नाही. जे दिघे यांच्या बाबतीत घडलं ते शिंदेंसोबत घडलं असतं. बंडानंतर ठाकरेंनी एक क्षणही पदावर राहायला नको. 56 मधून 35 आमदार फुटले, ठाकरे राजीनामा का देत नाहीत? साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष एकनाथ शिंदे यांच्या बंडाकडे आहे. शिंदेंना वारंवार अपमानास्पद वागणूक म्हणूनच त्यांचं बंड, शिंदेंची भूमिका हिंदुत्ववादी विचारांची आहे. एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”.
चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर निशाणा –
“आम्ही राजकीय पक्ष आहोत भजनमंडळी नाही. आमचं काम राजकारणाच्या माध्यमातून सत्तेवर येणे, लोकांची सेवा करणे आहे. सत्तेसाठी प्रस्ताव आल्यावर कोण नाही बोलणार. संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत आली आहे. त्यावर ते सामनामध्ये अग्रलेख लिहीतील की तुम्हाला आमची चिंता करण्याची गरज नाही. पण एकत्र काम केल्याने आम्हाला शिवसेनेबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की संजय राऊत शिवसेनेचे भयंकर नुकसान करत आहेत. ते काम त्यांना कोणी तरी दिले आहे.”
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
