🕒 1 min read
मुंबई : देशात सध्या अग्निपथ योजनेवरून राजकारण तसेच सामाजिक वातावरण चांगलेच चिघळत आहे. देशभरात याविरोधात निदर्शने केली जात आहेत. तरुंणानी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. यावरच आता भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव केले आहे.
“पत्थरवीर बनुन स्वतःच घर उध्वस्त करण्यापेक्षा अग्निवीर होऊन शत्रूच घर जाळा”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे. दरम्यान या योजनेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. भारतीय हवाई दलाने आपल्या वेबसाइटवर या योजनेची माहिती दिली आहे.
पत्थरवीर बनुन स्वतःच घर उध्वस्त करण्यापेक्षा….
अग्निवीर होऊन शत्रूच घर जाळा….— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 19, 2022
भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, अग्निवीरांना ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याच सुविधा लष्कराच्या जवानाला दिल्या जातील. एक सैनिक जसा जगतो तसाच जीवन अग्निवीरही सैन्यात जगेल. याशिवाय अनेक सुविधा या अग्निवीरांना दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजप २० जास्तीची मते कशी आणणार? चोऱ्यामाऱ्याच करणार ना?” संजय राऊतांची बोचरी टीका
- मेहबूब शेख प्रकरणात पीडित तरुणीच्या आरोपानंतर चित्रा वाघ यांच स्पष्टीकरण
- IND vs SA : धोनी आणि कोहली जी कामगिरी करू शकले नाहीत, ती करण्याची ऋषभ पंतला संधी
- “प्रत्येक संकटाला स्मित हास्याने सामोऱ्या जाणाऱ्या…”, नाना पटोलेंच्या राहुल गांधींना शुभेच्छा
- ‘अग्निपथ’ला विरोध करणाऱ्यांवर भडकली कंगना रणौत, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
