🕒 1 min read
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे ऑनलाइन मीडिया हक्क मिळवण्यासाठी अनेक बड्या कंपन्यांची लढाई सुरू आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन मीडिया हक्क मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये ऑनलाइन बोली सुरू झाली आहे. हे मीडिया हक्क विकत घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स-व्हायकॉम, डिस्ने हॉट स्टार, झी आणि सोनी, ड्रीम11, स्काय स्पोर्ट्स (यूके), सुपरस्पोर्ट्स (दक्षिण-आफ्रिका), तसेच फॅनकोड आणि फनएशिया यांचा समावेश आहे. या देशी आणि विदेशी कंपन्या आयपीएलचे टीव्ही आणि ऑनलाइन अधिकार मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या मीडिया हक्कांचा आयपीएलच्या पुढील पाच हंगामांसाठी म्हणजेच २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी लिलाव केला जात आहे.
या लिलावातून बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. आयपीएल ही एक लोकप्रिय स्पर्धा आहे. ती पाहणाऱ्यांची संख्या जितकी जास्त असेल तितकी पैसे गुंतवणाऱ्यांची यादी मोठी होईल. अॅमेझॉन, फेसबुक आणि गुगल हे मीडियाचे हक्क मिळवण्याच्या शर्यतीत आधी होते. परंतु त्यांनी आधीच आपली नावे मागे घेतली आहेत. परंतु असे असतानाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
IPL Media Rights bids have now surpassed the figure of 42,000cr.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 12, 2022
With media rights going massive, I hope all 10 IPL teams have cricket academies run all the day and make talents through their system as they sign young talents from age-group cricket as football club does.
— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2022
रविवारी १२ जूनला सकाळी ११ वाजता मुंबईत लिलाव सुरू झाला असून शेवटची बोली लागेपर्यंत तो सुरू राहणार आहे. ज्याप्रमाणे खेळाडूंच्या बोलीनंतर बोर्डाकडून माहिती दिली जाते. त्याचप्रमाणे मीडिया राइट्स मिळवणाऱ्या कंपनीचे नावही यानंतर जाहीर केले जाईल. हे आयपीएलच्या पुढील ५ हंगामांसाठी (२०२३ ते २०२७) वैध असणार आहे. एका अंदाजानुसार, बीसीसीआयला यावर्षी आयपीएल मीडिया हक्कांच्या लिलावातून ५० ते ६० हजार कोटी रुपये मिळू शकतात.
गेल्या वेळी बीसीसीआयने मीडिया हक्कांची लिलाव केला होता, तेव्हा स्टार इंडियाने पाच वर्षांसाठी (२०१८-२०२२) १६,३४७.५ कोटी रुपयांत लिलाव जिंकला होता. ही रक्कम २०१७ पूर्वी झालेल्या लिलावापेक्षा १५८% जास्त होती. स्टारच्या आधी हे अधिकार सोनीला देण्यात आले होते. २००८ मध्ये जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा ते सोनीनेच मिळवले होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
