🕒 1 min read
मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll”, असे ट्वीट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
दरम्यान शिवसेना तसेच भाजपकडून अनेक दावे केले जात होते. मात्र मतमोजणीनंतर संजय पवार यांना ३८ मतं तर धनंजय महाडिक यांना ४१ मतं मिळाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवशी त्यांना कोल्हापूरचा एक पैलवानच भेट दिला.” या निकालानंतर फडणवीसांच्या चाणक्य नीतीचे सर्वत्रच कौतुक होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Rajya Sabha election results : “मला स्वतःला धक्का बसेल असा…”, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
- ‘या’ राज्यात रेशनचे धान्य मिळणार एटीएम मशीनद्वारे ; वाचा सविस्तर
- “फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं…”, राज्यसभा निकालानंतर शरद पवारांचे वक्तव्य
- मोठी बातमी! महसूल वाढीसाठी दारूच्या किमती होणार ४० टक्क्यांनी कमी
- Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचे संजय पवार पराभूत; भाजपचा मोठा विजय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
