पंजाब : दारू हा अनेक तरुण लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्येच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाब सरकारने दारू प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. दारू च्या किमती कमी करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे. दारूचे दर ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
पंजाब हे असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी सर्वात जास्त प्रमाणात दारूची तस्करी होते. यामुळे सरकारचा लाखों रुपयांचा महसूल बुडतो. महसूल बुडत असल्यामुळे पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बिअर, विस्की आणि अन्य दारूचे दर तीस ते चाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत. दारूच्या किमती पहिल्या तर रॉयल स्टॅग व्हिस्की ची किंमत आधी ५०० रुपये होती आता ती ४२० रुपयांना मिळणार आहे. दारूच्या कमती कमी झाल्यामुळे त्याच्या विक्रध्ये वाढ होणार आहे.
या निर्णयामुळे दारूच्या तस्करीला आळा बसेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये पंजाब शेजारच्या राज्यांमधून जास्त प्रमाणात दारुची तस्करी होते. ही दारू अवैध मार्गाने पंजाबमध्ये विकली जात होती. यामुळे राज्य सरकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन कोट्यवधींचा निधी देखील बुडतो.
महत्वाच्या बातम्या :

