🕒 1 min read
मुंबई: काल (८ जून) औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी पहिल्यांदाच सेनेच्या मंचावर छत्रपती संभाजी राजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यातच उद्धव ठाकरे शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याबाबत मोठी घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.
“संभाजीनगर येथील सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते. भाषण संपेपर्यंत 40% मैदान रिकामं झालं होतं आणि म्हणे हे लाडके मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा तुम्ही बोललात मी संभाजीनगर नाव कधीही करू शकतो पण लगेच विषय बदलला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.
संभाजीनगर येथील सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते. भाषण संपेपर्यंत 40% मैदान रिकामं झालं होतं आणि म्हणे हे लाडके मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा तुम्ही बोललात मी संभाजीनगर नाव कधीही करू शकतो पण लगेच विषय बदलला. pic.twitter.com/uWmbGETGWz
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 8, 2022
दरम्यान “शहराचं नामकरण मी आताही करू शकतो. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल? त्यामुळे आधी शहराचा कायापालट केला जाईल, त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल.”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…हिंदुत्व सोडल्यावर बोलतील हे यांना का वाटू लागलं?”, अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
- “म्हटलं होतं ना, संभाजी महाराजांचा पुतळा स्टेज वर बसवतील पण…”, शालिनी ठाकरेंचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- “रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
- “गोपीनाथ मुंडेंनी मागणी करताच बाळासाहेबांनी…” ; उद्धव ठाकरेंनी करुन दिली भाजपला आठवण!
- “भाजपाच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे…”, मोहम्मद पैगंबरांच्या अवमानावरून उद्धव ठाकरेंनी सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
