🕒 1 min read
मुंबई: गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ #KK यांचं अकाली झालेलं निधन धक्कादायक आणि मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या निधनाने एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली!???????? pic.twitter.com/CDP5obJzoW— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 1, 2022
“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ KK यांचं अकाली झालेलं निधन धक्कादायक आणि मनाला चटका लावणारं आहे. त्यांच्या निधनाने एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्राचे राजकारण पवारांशिवाय पूर्णच होत नाही पण…”, प्रवीण दरेकरांचा टोला
- ‘आंखों में तेरी अजब सी…’, गाणारे प्रसिद्ध गायक KK यांचे निधन
- “विराट कोहलीनं वयाच्या ४५व्या…” शोएब अख्तरनं दिला जबरदस्त सल्ला; काय म्हणाला? वाचा!
- IND vs SA : भारताचा ‘हा’ युवा गोलंदाज ठरू शकतो आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी; वाचा!
- “उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करणार का?” उपाध्येंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
