Share

‘आंखों में तेरी अजब सी…’, गाणारे प्रसिद्ध गायक KK यांचे निधन 

Published On: 

मुंबई: गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातूनही अनेक दिग्गजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. के.के. यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू.”, असे मोदी यांनी म्हटले आहे. तर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, प्रसिद्ध गायक श्री कृष्णकुमार कुननाथ यांच्या आकस्मिक निधनाने मला दु:ख झाले आहे. आपल्या सुमधुर आवाजासाठी आणि सुरेल गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री केके यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. शांती!

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!