Share

IPL 2022 Final : फायनलमध्ये फिक्सिंग झाली होती..? सॅमसनच्या ‘त्या’ निर्णयावर नेटकऱ्यांचा आक्षेप; पाहा ट्वीट!

Published On: 

🕒 2 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सने अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला मात देत पहिले विजेतेपद पटकावले. सामना रोमहर्षक झाला असला तरी सोशल मीडियावर #FIXING हा शब्द ट्रेंड होऊ लागला. यानंतर राजस्थानच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. नेटकऱ्यांनीही संजू सॅमसनच्या टॉसनंतर फलंदाजी घेतल्याच्या निर्णयावर प्रश्न उरपस्थित केले.

टॉस जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय संघाच्या बाजूने सिद्ध झाला नाही. उलट या संपूर्ण सामन्यात टायटन्सने एकतर्फी विजयाची नोंद केली. मात्र, टॉसनंतर सॅमसनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने चाहते चांगलेच संतापले.

https://twitter.com/imranba41465365/status/1530985058198122496

https://twitter.com/RajeshP92414993/status/1530992653046689792?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1530992653046689792%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Ffans-accuse-rr-of-fixing%2F

असा रंगला सामना…

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!