Share

IPL 2022 : आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे डझनभर खेळाडू झाले चॅम्पियन, कोहली मात्र विजेतेपदाच्या प्रतीक्षेत!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात विराट कोहली सर्वाधिक चर्चेत असतो. यालाही कारण आहे कारण आतापर्यंत त्याला एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. आयपीएल २०२२ मध्येही त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्वालिफायर २ मध्ये कोहलीच्या संघाचा राजस्थान रॉयल्सकडून पराभव झाला. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या १५ व्या मोसमाचे विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने अंतिम सामन्यात राजस्थानचा पराभव केला. पदार्पणाच्या मोसमातच स्पर्धा जिंकणारा हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने असा पराक्रम केला होता.

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा गुजरात टायटन्स संघामध्ये समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नसली तरी विजेतेपद पटकावण्यात त्याच्या संघाला यश आले. आयपीएलचे जेतेपद पटकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा १६ वा खेळाडू ठरला. यापूर्वी २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये सहभागी असलेला वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडही विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला होता. त्याच वेळी २०२० मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सहभागी असलेला वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईल याने फायनल जिंकली होती.

२००८ पासून ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न आणि शेन वॉटसन हे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले होते. २००९ मध्ये अॅडम गिलख्रिस्ट, अँड्र्यू सायमंड्स, रायन हॅरिस आणि २०१० मध्ये मॅथ्यू हेडन आणि डग बॉलिंगर यांनी फायनल जिंकली होती. २०११ मध्ये माईक हसी आणि बोलिंगर चेन्नईसाठी विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरले होते. अशाप्रकारे २ आयपीएल विजेतेपद पटकावणारा बॉलिंगर हा पहिला कांगारू खेळाडू ठरला.

२०१२ मध्ये वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि २०१३ मध्ये वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने अव्वल स्थान पटकावले होते. २०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादला चॅम्पियन बनवले होते. त्याच्या संघात मोइसेस हेन्रिक्स आणि बेन कटिंग यांचाही समावेश होता. मिशेल जॉन्सनला २०१७ मध्ये दुसऱ्यांदा आणि शेन वॉटसनने २०१८ मध्ये दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!