🕒 1 min read
मुंबई : आयपीएलच्या 15व्या हंगामाचा मेगा फायनल रविवारी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे बीसीसीआय खूप खूश आहे. फायनलच्या एका दिवसानंतर बीसीसीआयच्या वतीने सचिव जय शाह यांनी सर्व सामन्यांदरम्यान खेळपट्टी तयार करणाऱ्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनला १.२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
आयपीएल २०२२ मध्ये कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, यावेळी सुरुवातीच्या लीग टप्प्यातील सामने मुंबई आणि पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यानंतर कोलकात्यात क्वालिफायर, एलिमिनेटर आणि अहमदाबादची फायनलसाठी निवड झाली. हंगामातील सर्व ७४ सामन्यांदरम्यान खेळपट्टी क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन यांनी मैदानावरील सामन्याचे चांगले निकाल येण्यासाठी आणि ते रोमांचक होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोमवारी सोशल मीडियावर माहिती देत या सर्वांसाठी बक्षीस जाहीर केले.
जय शाह यांनी ट्विट केले की, “या वर्षीच्या आयपीएलसाठी क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनला व मैदानाची देखरेख सर्वांना १.२५ कोटी रुपयांची बक्षिस जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचे अनसंग हिरो क्युरेटर्स आणि ग्राउंड्समन आहेत. ज्यांनी या १५ व्या हंगामात अप्रतिम कामगिरी केली आहे.
I'm pleased to announce a prize money of INR 1.25 crores for the men who gave us the best games in #TATAIPL 2022. The unsung heroes – our curators and groundsmen across 6 IPL venues this season.
— Jay Shah (@JayShah) May 30, 2022
२६ मार्च ते २२ मे या कालावधीत आयपीएलचे सुरुवातीच्या सामन्यात एकूण ७० लीग सामने आयोजित करण्यासाठी ५ ठिकाणे निवडण्यात आली होती. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर आयोजित करण्याची जबाबदारी ईडन गार्डन्स, कोलकाताकडे देण्यात आली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना खेळला गेला. साखळी सामन्यांचे आयोजन करणाऱ्या स्टेडियमच्या क्युरेटर्स आणि ग्राउंड्समनला २५ लाख रुपये, तर बाद फेरीचे आयोजन करणाऱ्यांना १२.५ लाख रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
