Share

IPL 2022 Final GT vs RR : “…तर चमत्कार घडू शकतात”, ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते एकदा वाचाच!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (GT vs RR) पराभव केला. संघाच्या दमदार कामगिरीवर कर्णधार हार्दिक पंड्या खूश होता आणि त्याने त्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगितल्या. अंतिम सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

जगातील कोणत्याही संघासाठी हे योग्य उदाहरण असल्याचे हार्दिक पंड्याने सांगितले. हार्दिक म्हणाला, ”जर तुम्ही एक संघ म्हणून खेळू शकत असाल आणि खऱ्या खेळाडूंसह एक चांगले युनिट तयार केले तर चमत्कार घडू शकतात. मी आणि आशू पा (आशिष नेहरा) आम्हाला योग्य गोलंदाज खेळवायला आवडतात. मी बहुतेक वेळा टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ पाहिला आहे पण गोलंदाजही तुमचा खेळ जिंकतात.”

पंड्या पुढे म्हणाला, ”आम्ही सामनेही जिंकले, पण आम्ही नेहमी आमच्याकडून काय चुकलो आणि इथून आम्ही कसे चांगले होऊ शकतो याबद्दल बोललो. त्यात सर्वांनी सहभाग घेतला. (मुंबई इंडियन्ससह) पाच फायनल जिंकल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि आता येथे येणे खूप आनंददायी आहे. पहिल्याच प्रयत्नात एखादा संघ विजेतेपद मिळवतो, हे सर्वांनाच लक्षात राहिल.”

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीसाठी हार्दिक पंड्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. याबाबत तो म्हणाला, ”आजचा दिवस गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून होता, मी माझे सर्वोत्तम दिले. माझ्या स्पेलच्या दुसऱ्या चेंडूवर जेव्हा मी संजूला आऊट केले, तेव्हा मी पाहिले की जर तुम्ही विकेटला जोरात हिट केले तर काहीतरी होईल हे कळले. मी कुठेही खेळू शकतो आणि माझा संघ जिंकला तर मी कमी स्ट्राइक रेटने फलंदाजीही करू शकतो. संघ माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!