नवी दिल्ली: गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठीकला आहे. यानंतर ते भाजपात जाणार, अशा चर्चा रंगत आहेत. यावरच आता स्वतः हार्दिक पटेल यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.
“मी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला सांगेल.”, असे उत्तर हार्दिक पटेल यांनी दिले आहे. यामुळे सध्यातरी हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार नाहीत,या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख भाग होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला.
दरम्यान काँग्रेस दिशाहीन पक्ष आहे. काँग्रेसकडे दूरदृष्टीचा अभाव आहे, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. आता काँग्रेसमधून निघाल्यावर हार्दिक पटेल कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 : “लोकांना हार्दिक पंड्या का आवडतो…?” वीरेंद्र सेहवागनं सांगितली ‘ही’ बाब, काय म्हणाला? वाचा!
- “नकारात्मक गोष्टी पाहत नाही, सकारात्मकतेने काम करतो” ; समीर वानखेडेंचं ‘सूचक’ ट्विट
- सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात मोठा खुलासा! “तिहार जेलमध्ये गुंडाने…”
- मी मानहानीच्या दाव्याला घाबरत नाही – चंद्रकांत खैरे
- “बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे…”, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

