मुंबई : हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करून आयपीएल २०२२ (IPL 2022 Final)चे विजेतेपद जिंकले. राजस्थानने ठेवलेल्या १३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने १८.१ षटकात ३ गडी गमावून १३३ धावा केल्या आणि अंतिम सामना जिंकला. कर्णधार हार्दिक पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. हार्दिकने गोलंदाजीत ३ विकेट घेतल्या, त्यानंतर फलंदाजीतही ३४ धावा केल्या.
हार्दिक पंड्या आणि कंपनीला चकचकीत ट्रॉफीसह बक्षीस रक्कम म्हणून २० कोटी रुपये मिळाले. उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला १२.५ कोटी तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७ कोटी रुपये देण्यात आले. चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सला ६.५ कोटी रुपये देण्यात आले. हार्दिक पंड्याने प्रथमच आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करत संघाला चॅम्पियन बनवले.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.