🕒 1 min read
दिल्ली : राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने एकूण १० उमेदवारांचे नाव जाहीर केले आहे. काँग्रेसमधील पक्षातील अनेक ज्येष्ठ आणि राज्यसभेसाठी इच्छूक नेत्यांचे नाव नसल्याने आता पक्षात नाराजीनाट्य रंगले आहे. तसेच महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांचे नाव जाहीर झाल्याने, राज्यातील काही काँग्रेस नेते नाराज असल्याचे बोलले जाते. एकूणच पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. नेत्यांची नावं या यादीत नसल्याने आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
राजस्थानमधून ही काँग्रेस पक्षात तीव्र नाराजी दिसून येत आहे. राजस्थानच्या राज्यसभा कोट्यातून रणदीप सिंग सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र हे तिन्ही उमेदवार राजस्थानचे नाहीत. या तिन्ही नावांना राजस्थानच्या सिरोही विधानसभाचे काँग्रेस आमदार संयम लोढा यांनी आक्षेप घेतला आहे. राजस्थानमधल्या कोणालाही उमेदवारी का जाहीर झाली नाही, याचे स्पष्टीकरण पक्षाला द्यावं लागणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
‘शायद मेरी तपस्या में कुछ कमी रह गई’
— Pawan Khera ???????? (@Pawankhera) May 29, 2022
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी देखील आपली नाराजी ट्विटरवरून जाहीर केली आहे. ट्वीट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मूळचे राजस्थानचे असलेले पवन खेरा यांना राजस्थानच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची आशा होती. मात्र त्यांचे नाव उमेदवारी यादीत नव्हते. उमेदवारांची यादी जाहीर होताच, त्यांनी ट्विट करून आपली नाराजी उघड केली. ‘कदाचित माझ्या तपश्चर्येत काही उणीवा राहिली असतील,’ असे त्यांनी ट्विट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील…”, अमोल मिटकरींचा टोला
- 8 years of BJP : “आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे…”, अमित शाहांची स्तुतीसुमने
- “भाजपला ‘कोथळा’ शब्दाची ऍलर्जी पण सापळा, कोंडी हे त्यांचे आवडते शब्द”, संजय राऊतांचा टोला
- “भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप
- “…ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे”, संजय राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
