Share

“भाजपने राज ठाकरेंच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली”, ‘शिवसेने’चा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजप तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakrey,) यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात संघर्ष पहावयास मिळत आहे. शिवसेनेने राजेंना दिलेला शब्द मोडला, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. यावरच संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संभाजी छत्रपती यांना दिलेला शब्द मोडला. हा शब्द वगैरे देताना फडणवीस तेथे हजर नव्हते. शिवसेना व संभाजीराजे यांच्यात जे घडले ते चार भिंतींतले आहे. शिवसेना राज्यसभेच्या दोन जागा लढवणार आहे व संभाजीराजांनी अपक्ष न लढता शिवसेनेचा उमेदवार व्हावे एवढ्यापुरतीच ही चर्चा मर्यादित आहे. दोघांत राजकीय व्यवहार जमला नाही, मग तो भाजपाशी तरी जमला का? शरद पवार यांनी आधी संभाजीराजांना पाठिंब्यासाठी घोषणा केली आणि नंतर त्यांनी घूमजाव करत पाठिंबा काढून घेतला असे फडणवीस सांगतात. ही ‘मोदी स्कूल’ची लोणकढी थाप आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

उलटपक्षी संभाजीराजे यांची कोंडी करायला सुरुवात केली ती भाजपानेच. संभाजीराजे फडणवीस यांना भेटले व पाठिंब्यासाठी विनंती केली. तेव्हा ‘‘आम्ही संभाजीराजांना पाठिंबा देतोच’’ असे फडणवीस म्हणाले नाहीत. त्यांनी राजेंना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. ‘‘विचार करू’’, ‘‘वरच्यांना विचारून निर्णय घेऊ’’ अशी थातूरमातूर उत्तरे त्यांनी दिली. त्यामुळे सहाव्या जागेसाठी अपक्ष लढू पाहणाऱ्या संभाजीराजेंना भाजपानेच सापळ्यात अडकवले. हा त्यांचा जुनाच धंदा आहे. असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच राज ठाकरे यांच्या खांद्यावर ‘भोंगा’ लावून त्यांची कोंडी केली. पुढे त्यांच्या अयोध्या दौऱ्यास उत्तेजन देऊन पुन्हा आपल्याच खासदाराकडून जोरदार विरोध करायला लावला व एकप्रकारे मोठी कोंडीच निर्माण केली. हाच त्यांचा राजकीय पॅटर्न असतो. शिवसेना असे कधीच करत नाही. जे करायचे ते समोर, बोलायचे तोंडावर. त्यामुळे सहाव्या जागेसाठी आम्ही संभाजीराजेंची कोंडी केली हे फडणवीसांचे वक्तव्य फसले आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!