Share

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना CBI कडून अटक; नेमके प्रकरण काय?

Published On: 

🕒 1 min read

पुणे: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफएल प्रकरणात 300 कोटींहून जास्तची फसवणूक केल्याप्रकरणी  गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती, त्यानंतर अखेर त्यांना काल (२६ मे) अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले यांना येस बॅंक आणि डीएचएफएल बॅंक गैरव्यवहार प्रकरणी CBI ने अटक केली आहे. भोसले यांच्या घरावर  मागील वर्षी CBI ने त्यांची 40.34 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान येस बॅंक व डीएचएफएल प्रकरणी यापुर्वी उद्योजक संजय छाब्रिया यांना अटक केली असून विनोद गोएंका व शाहीद बलवा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणी अविनाश भोसले यांचेही नाव पुढे आले होते.

दरम्यान अविनाश भोसले हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, उद्योजक असून त्यांचा मुंबई व पुण्यात बांधकाम व्यवसाय आहे.  दरम्यान, सीबीआयने गुरुवारी सायंकाळी त्यांना त्यांच्या घरातुन अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!