🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मधील एलिमिनेटर सामन्यात रजत पाटीदार (Rajat Patidar) हा पेपर लखनऊ सुपर जायंट्ससाठी अवघड ठरला आणि केएल राहुलची अख्खी सेना या परीक्षेत नापास झाली. ईडन गार्डन्सवर रंगेलल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं लखनऊला १४ धावांनी मात देत क्वालिफायर-२च्या दिशेनं पाऊल टाकलं. रजतनं नाबाद ११२ धावांची खेळी करत लखनऊच्या गोलंदाजांची पिसं काढली. पाटीदारच्या तडाख्यामुळं लखनऊला आरसीबीचं आव्हान डोईजड झालं आणि त्यांना जवळ जाऊनही गुडघे टेकावे लागले.
दबावपूर्ण मॅच आणि हजारो चाहत्यांच्या आरडो-ओरडीत पाटीदारनं चतुर डोक्यानं खेळ केला. दोन जीवदानाचा फायदा उचलत आणि षटकार खेचत त्यानं आपलं शतक पूर्ण केलं. हेल्मेट न काढता आणि कोणताही गाजावाजा न करता त्यानं ते शांतपणे साजरंही केली. ”मला माझ्या शतकाची पडली नव्हती, संघाचा हित महत्त्वाचं होतं”, असंही त्यानं या खेळीनंतर सांगितलं. क्षेत्ररक्षण समजून फलंदाजी कशी करावी, याचा नमुना रजतनं चोख पद्धतीनं दाखवला आणि ट्विटर, फेसबुक अशा नाना सोशल मीडियावर पाटीदार ट्रेंड होऊ लागला. त्यानंतर कोण, कुठला पाटीदार अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.
A 49-ball century for Rajat Patidar in the eliminator????
What a knock!
????: Disney+Hotstar pic.twitter.com/PgXP9rRDfg
— CricTracker (@Cricketracker) May 25, 2022
यंदाच्या हंगामात जेव्हा बंगळुरू संघाचा खेळाडू लवनीत सिसोदिया दुखापतग्रस्त झाला, तेव्हा बंगळुरूनं पाटीदारला स्थान दिलं. मागील हंगामातही पाटीदार या संघात होता. २० लाखांच्या मूळ किमतीत रजत आरसीबीच्या ताफ्यात सामील झाला. पण त्याच्या या शतकी खेळीचं महत्त्व किती अमूल्य होतं, हे आरसीबीशिवाय दुसरं कोणाला उमगलं असेल.
रजत पाटीदारचा जन्म १ जून १९९३ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. रजत मनोहर पाटीदार असं त्याचं पूर्ण नाव. तो मध्य प्रदेशातील एका व्यापारी कुटुंबातून येतो. वयाच्या आठव्या वर्षी रजत क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला आणि नंतर आजोबांच्या प्रोत्साहनानं क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला. रजत गोलंदाजीही करू शकतो, गोलंदाजीची संधी मिळाल्यास तो ऑफब्रेक गोलंदाजी करतो.
२८ वर्षीय रजतनं २०१५-१६ रणजी ट्रॉफीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ८ जानेवारी २०१८ रोजी मध्य प्रदेशसाठी तो पहिला विभागीय टी-२० लीग सामना खेळला. रजतनं ३१ टी-२० सामन्यांमध्ये ८६१ धावा केल्या आहेत, ज्यात सात अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्यानं मध्य प्रदेशसाठी फक्त आठ सामन्यांमध्ये ७१३ धावा केल्या.
Rajat Patidar scored a scintillating 1⃣1⃣2⃣* & bagged the Player of the Match award as @RCBTweets beat #LSG in Eliminator of the #TATAIPL 2022. ???? ???? #LSGvRCB
Scorecard ▶️ https://t.co/cOuFDWIUmk pic.twitter.com/eNepG92nc5
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
गेल्या आयपीएलमध्ये रजतनं चार सामने खेळले. ज्यामध्ये त्यानं सर्वाधिक ३१ धावा करत एकूण ७१ धावा केल्या. रजतनं झळकावलेलं शतक हे या आयपीएल मोसमातील सर्वात वेगवान शतक (४९ चेंडू) ठरलं. एखाद्या अनकॅप्ड क्रिकेटरनं आयपीएल प्लेऑफमध्ये शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ. आयपीएल लीगमध्ये शतक झळकावणारा पाटीदार हा केवळ चौथा अनकॅप्ड क्रिकेटर ठरला. आता रजतचं पुढचं टार्गेट राजस्थान रॉयल्स आहे. या सामन्यातही त्यानं संघाला हवी तशी कामगिरी केली तर आरसीबी संघ त्याचा कायमस्वरुपी ऋणी राहील एवढं नक्की!
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
