Share

IPL 2022 : ‘बाप’मोलाचा सल्ला..! पदार्पणाची संधी हुकलेल्या अर्जुनला सचिननं दिला कानमंत्र; म्हणाला, “हा रस्ता…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला पदार्पण करण्याची संधी दिली नाही. अर्जुन संपूर्ण हंगाम बेंचवर बसला. दिग्गज क्रिकेटर आणि वडील म्हणून सचिन तेंडुलकरने अर्जुनसोबत केलेल्या संभाषणाचा खुलासा केला. सचिनने अर्जुनला मोलाचा सल्ला दिला आहे.

अर्जुन गेल्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. यादरम्यान अनेक तरुणांना पदार्पणाची संधी मिळाली, पण हा खेळाडू अजूनही संधीच्या शोधात आहे. या मोसमात मुंबई फार पूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे गेल्या काही सामन्यांदरम्यान अर्जुनला पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही.

यूट्यूब चॅनलवर सचिन तेंडुलकरने चाहत्यांशी संवाद साधला आणि यादरम्यान त्याला अर्जुन तेंडुलकरला खेळाताना पाहेल आवडेल का, असे विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, ”हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करत आहे किंवा मला काय वाटते हे महत्त्वाचे नाही. हंगाम आधीच संपला आहे. अर्जुनशी माझे संभाषण नेहमीच असे होते, की हा रस्ता आव्हानात्मक, खडतर असेल. तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली कारण तुला क्रिकेट आवडते, ते करत राहा, मेहनत करत राहा आणि त्याचे फळ नक्की मिळेल.”

अर्जुन तेंडुलकरचा रणजी संघातही त्याचा समावेश होता. मात्र, नुकत्याच बाद फेरीसाठी जाहीर झालेल्या मुंबई संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. अर्जुन पुढे कशी कामगिरी करतो आणि मुंबई इंडियन्स त्याला पुढील हंगामात कायम ठेवणार की नाही हे पाहणे बाकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!