मुंबई: महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि वेलोसिटी यांच्यात मंगळवारी खेळला गेला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात वेलोसिटीच्या संघानं सुपरनोव्हासला ७ गडी राखून पराभूत केलं. कालच्या सामन्यात वेलोसिटी संघाकडून गोलंदाजी करताना महराष्ट्राच्या माया सोनावनेने सर्वांचं लक्ष वेधले. तिच्या गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे माया सोनावने चर्चेत आहे.
सामन्यात वेलोसिटी संघाची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्याच्या ११व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या माया सोनावनेने सर्वांचे लक्ष वेधले. तिची आगळीवेगळी गोलंदाजी शैली चर्चेचा विजय ठरत आहे. सोनावनेने डावाचे ११ वे षटक टाकले. या षटकात तिने फक्त ५ धावा दिल्या. सोनावने लेग स्पिन गोलंदाजी करते. तिची गोलंदाजी शैली दक्षिण आफ्रिकेचा माजी फिरकीपटू पॉल एडम्स यांच्याशी मिळतीजुळती आहे. तिची गोलंदाजी शैली सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
https://twitter.com/IPL/status/1529054037391581184?t=_w_J23cIYhTzG-V3-jn4dg&s=19
https://twitter.com/WomensCricCraze/status/1529053774093746176?t=Y2Oeq9FIa52vVVOvLua9Mg&s=19
पॉल एडम्सची गोलंदाजी शैली
https://twitter.com/vikramsathaye/status/1259754321664761856?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1259754321664761856%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-30461406671814118745.ampproject.net%2F2205120110001%2Fframe.html
माया सोनावने सध्या तिच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे जरी चर्चेत असली तरी तिला कालच्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तिला डावात फक्त दोनच षटके टाकण्याची संधी मिळाली. या दोन षटकांमध्ये तिने पहिल्या षटकात ५ व दुसऱ्या षटकात १४ अश्या दोन्ही षटकांमध्ये मिळून १९ धावा दिल्या.
महत्वाच्या बातम्या:

